बुलेटवर चालवत पिस्टल हातात घेऊन रिल्स बनवणाऱ्या नगरसेवक पुत्रावर गुन्हा दाखलसोलापूर|

रंगपंचमी निमित्त सोलापुरात नागरिकांनी मोठ्या उत्साहाने आनंद साजरा केला.रंग खेळतानाचे अनेक नागरिकांनी रिल्स तयार करून सोशल मीडियावर अपलोड केले आहे.नगरसेवक नागेश गायकवाड यांचे पुत्र चेतन गायकवाड व राजू भंडारी हा दोघांनी अपवादात्मक रिल्स तयार करून फेसबुकवर अपलोड केले आहे.बुलेट चालवत हात सोडून हातात पिस्टल घेऊन रिल्स तयार केले आहे.हे सोशल मीडियावर वायरल होताच सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.सलगर वस्ती पोलीस ठाण्यात नेमणूक असलेले सचिन शिंदे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.फिर्यादीत नमूद केल्यानुसार रिल्स तयार करणाऱ्यावर भा.द.वि.505,279 व भारतीय शस्त्र अधिनियम नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

तपासात पिस्टल जप्त होणार-
सलगर वस्ती पोलीस सोशल मीडियावर वायरल झालेल्या रिल्समुळे अलर्ट झाले आहेत.रिल्स तयार करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार दोघांना बोलावून त्यांची पिस्टल जप्त केली जाणार आहे.ती पिस्टल खरी आहे का याची शहानिशा केली जाणार आहे.खरी पिस्टल असेल तर ,ती जप्त करून शस्त्र परवान्याबाबत चौकशी केली जाणार आहे.

ती तलवार तर लाकडी निष्पन्न झाली,आता पिस्टल बद्दल काय होईल-
हिंदू जनगर्जना मोर्चात हातात तलवार घेऊन हवेत फिरवल्या प्रकरणी राष्ट्रवादीचे महेश कोठे यांचे पुत्र,प्रथमेश कोठेवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.पोलीस तपासात ती तलवार लाकडी आहे असे ,निष्पन्न झाले आहे.पण हिंदू गर्जना मोर्चात मोठा पोलीस फौजफाटा तैनात असताना,तलवार हवेत फिरवली होती.त्याचवेळी तलवार जप्त करून ,त्याची शहानिशा करण्यास पोलिसांनी दिरंगाई केली होती.गुन्हा दाखल होईपर्यंत पोलिसांनी वाट पाहून मग शहानिशा केली.आता नगरसेवक पुत्र नागेश गायकवाड यांचे पुत्र चेतन गायकवाड यांची पिस्टल जप्त करून शहानिशा केली जाणार.बाहेर देशांतून अनेक लायटर हे पिस्टल प्रमाणे असतात,आता ही पिस्टल लायटर ही असेल का ?असा अंदाज अनेक जण लावत आहेत.

Post a Comment

0 Comments