सोलापूर | तलावात उडी मारून तरुणीने केली आत्महत्या


सोलापूर - सोलापूर शहरात धक्कादायक घटना घडली आहे. एका १८ वर्षीय तरुणीने तलावात उडी मारून आत्महत्या केली आहे.

संजना जगदीश सुरवाडे वय १८ (रा. तळे हिप्परगा तालुका उत्तर सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास तरुणीचा मृतदेह तळे हिप्परगा येथील तलावाच्या पाण्यात बेशुध्द अवस्थेत मिळून आला होता. मृतदेह पाण्यातून बाहेर काढून सोलापूर शहारातील शासकिय रुग्णालयात उपचारासठी दाखल केले असता उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले आहे. आत्महत्यांचे कारण अद्याप अस्पष्ट असून या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे झाली आहे. मृत संजना सुरवाडे या तरुणीने नुकतीच १२ वी सायन्सची परीक्षा दिली आहे.

Post a Comment

0 Comments