पानगाव येथे मोटर सायकलची समोरासमोर धडक ; दोन जण ठार


बार्शी |

सोलापूर बार्शी महामार्गावर पानगाव जवळ दोन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन्ही मोटरसायकल चालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल राहुल बोंदर यांनी तालुका पोलिसात दिली आहे.

याविषयी सविस्तर वृत्त असे की, मोटरसायकल क्रमांक एम एच १३ डी डब्ल्यू ९९ ३० याचे चालक करण उर्फ शिवम राजेश वडेकर वय २५ रा. भवानी पेठ बार्शी वैराग कडून बार्शीकडे येत असताना पानगाव खोमणे चहा कॅन्टीन च्या समोर आल्यानंतर बार्शी कडून येणारी मोटरसायकल क्रमांक एम एच१३ बी टी ५८२४  चे मोटरसायकल स्वार बाबू कांतु राठोड वय ५० रा. गुळवंची तांडा, ता. उत्तर सोलापूर या दोन मोटरसायकल स्वार यांची समोरासमोर धडक होऊन दोघेही ठार झाले आहेत या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास बार्शी तालुका पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments