आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नामुळे बार्शी तालुक्यातील विविध कामांसाठी १६६ कोटी ४० लाख रुपये निधी मंजूर


बार्शी |

बार्शी उपसा सिंचन योजनेच्या उर्वरित कामासाठी ८० कोटी, ग्रामीण भागातील रस्ते कामासाठी ७५ कोटी ४७ लाख,बार्शी ते तुळजापूर रस्त्याचे सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे यासाठी 57 लाख,न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश ३ व दिवाणी न्यायाधीश(SD) २,दिवाणी न्यायाधीश २ (JD) यांच्या निवासस्थानासाठी ५ कोटी ५५ लाख,प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत तालुक्यातील २४ गावातील तीर्थक्षेत्राचा पर्यटन विकास करण्यासाठी ४ कोटी ८१ लाख रुपये मंजूर करण्यात आल्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.

बार्शी तालुक्यातील अनेक रस्त्यांची झालेली दुरावस्था ते रस्ते दुरुस्त करण्यासाठी आमदार राजाभाऊ राऊत हे सतत प्रयत्नशील असून यापूर्वीही त्यांनी तालुक्यातील रस्ते विकास व दुरुस्तीच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून घेतलेला आहे.अर्थसंकल्पात मंजूर झालेला निधी व तरतूद केलेल्या रस्त्यांची नावे व निधी पुढील प्रमाणे-                                                
१) बार्शी तुळजापूर रोड कि.मी. २२/६०० ते २५/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ९० लाख
२) मोहोळ वैराग रोड कि.मी. २२०/०० ते २२१/४०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी
३) भूम वारदवाडी ते शेंद्री रोड किमी १६९ / ३०० ते १७१/८०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ४० लाख
४) भूम वारदवाडी शेंद्री रोड किमी १७१/८०० ते १७४ / ३०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ९० लाख
५) अंजनगाव श्रीपत पिंपरी,कोरफळे,पानगाव साकत पिंपरी ते किमी २६/०० ते २९/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ५० लाख
६) बार्शी ते आरणगाव,धोत्रे,पिंपळगाव ते घारी रोड किमी ९०० ते १४०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी
७) अंजनगाव,श्रीपत पिंपरी, कोरफळे,पानगाव साकत पिंपरी किमी २२/०० ते २६/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ६५ लाख
८) आगळगाव,उंबरगे,भानसळे,खडकोणी, कोरेगाव रोड किमी १०/०० ते १३/८०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ६५ लाख 
९) देवगाव,पिंपळगाव,खडकलगाव,आगळगाव, कुसळंब,खामगाव,तांदुळवाडी,बावी,पानगाव, रस्तापूर,सुर्डी,यावली,तडवळे,मुंगशी ते कोथळी रोड किमी २७/०० ते ३४/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ९० लाख
१०) अंजनगाव,श्रीपत पिंपरी,कोरफळे,पानगाव, साकत पिंपरी किमी ९/०० ते १०/७०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी
११) बार्शी,गाडेगाव रोड किमी ०/०० ते ४/०० मध्ये  सुधारणा करणे यासाठी २ कोटी ५० लाख
१२) बार्शी,मालवंडी,मानेगाव,नरखेड रोड किमी १४/०० ते १८०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ९० लाख
१३) बार्शी,आरणगाव,धोत्रे,पिंपळगाव ते घारी रोड किमी ५/८०० ते ९०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ९० लाख.
१४) गोरमाळे,नारी,इंदापूर,उपळे दुमाला, मुंगशी(आर),रातरंजन, हिंगणी(आर), धामणगाव(दु),शेलगाव (आर) ते कौठाळी रोड किमी २१/६०० ते २५/९०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी
१५) रातरंजन,हत्तीज,सारोळे रोड किमी ०/०० ते ४/५०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी
१६) वैराग,हिंगणी,मालेगाव,चिखर्डे,गोरमाळे,पांगरी, उक्कडगाव जिल्हा हद्द किमी १८/०० ते १९/०० आणि किमी २५/०० ते २७/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ९० लाख
१७) काटेगाव,चारे,पाथरी,पांगरी,कारी रोड किमी ०/०० ते ३/४०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी
१८) देवगाव,पिंपळगाव,खडकलगाव,आगळगाव कुसळंब,खामगाव,तांदुळवाडी,बावी,पानगाव, रस्तापूर,सुर्डी,यावली,तडवळे,मुंगशी ते कोथळी रोड किमी ३/०० ते ६/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ९० लाख
१९) अंजनगाव,श्रीपत पिंपरी,कोरफळे, पानगाव, साकत पिंपरी किमी ६/८०० ते ९/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ५० लाख
२०) देवगाव,पिंपळगाव,खडकलगाव,आगळगाव, कुसळंब,खामगाव,तांदुळवाडी,बावी,पानगाव, रस्तापूर,सुर्डी,यावली,तडवळे,मुंगशी ते कोथळी किमी ६/०० ते ९/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ५० लाख
२१) बार्शी,उपळाई ठोंगे किमी ०/०० ते ५/५०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी
२२) बाभुळगाव,धानोरे रोड किमी ०/०० ते ३/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी १ कोटी २५ लाख
२३) धानोरे,पुरी रोड किमी ०/०० ते ३/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी १ कोटी २५ लाख
२४) वैराग,लाडोळे,हळदूगे,उपळे दुमाला रोड किमी ०/०० ते ९०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ९० लाख
२५) राज्य मार्ग २०६ ते रऊळगाव रस्ता किमी ०/०० ते ४/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी
२६) हळदुगे,नांदणी रोड किमी ०/०० ते ४/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी,
२७) खामगाव ते पिंपळगाव ते पुरी रस्ता किमी ०/०० ते ७/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी ५० लाख 
२८) आगळगाव ते देवळाली रोड किमी ०/०० ते ५/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी,
२९) शेलगाव ते खडकलगाव जिल्हा सीमा किमी ०/०० ते ६/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी
३०) उंडेगाव ते इर्ले रोड किमी ०/०० ते २/५०० मध्ये सुधारणा करणे यासाठी ३ कोटी २५ लाख,
३१) उंडेगाव ते पानगाव रस्ता किमी ०/०० ते ५/०० मध्ये सुधारणा करणे यासाठी २ कोटी २५ लाख
३२) सासुरे ते कौठाळी रोड किमी ०/०० ते २/५०० मध्ये सुधारणा करणे यासाठी १ कोटी ५० लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत.

 सदरील रस्त्याची कामे मंजूर करण्यासाठी आमदार राजाभाऊ राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्याशी सतत पत्रव्यवहार करून या रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती.सदरील कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांचे राजाभाऊ राऊत यांनी बार्शी तालुक्याच्या वतीने व नागरिकांच्या वतीने जाहीर आभार मानले.

Post a Comment

0 Comments