महाराष्ट्र विद्यालयाचे NNMS परीक्षेमध्ये घवघवीत यश

बार्शी |

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत २१ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक (एन.एम.एम.एस) शिष्यवृत्ती 
परीक्षेत महाराष्ट्र विद्यालयातील एकूण ७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना श्रीमती एस.एस. कातळे, श्री.सचिन देशमुख, श्री.अतुल नलगे, श्री.सुजीत लोखंडे यांचे मार्गदर्शन लाभले. 

सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ.बी.वाय. यादव,उपाध्यक्ष एन.एन. जगदाळे, संस्थेचे सचिव तथा शाळा समितीचे अध्यक्ष पी.टी.पाटील, सहसचिव तथा शाळा समितीचे सदस्य श्री.ए.पी.देबडवार, संस्थेचे खजिनदार श्री.जयकुमार शितोळे,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. व्ही.एस.पाटील,बी.के.भालके सर्व कार्यकारिणी सदस्य व सर्व संस्था सदस्य, विद्यालयाचे प्राचार्य जी.ए. चव्हाण,उपमुख्याध्यापक श्री.आर.बी. सपताळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments