चिंचवड पोटनिवडणुकीला नाट्यमय वळण ; कार्यकर्ते गोंधळातमुंबई | 

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीला नाट्यमय वळण मिळालं आहे. आज मोरया गोसावीचं दर्शन घेऊन अश्विनी जगताप  यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि अर्ज ही भरला आहे. तर दुसरीकडे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. शंकर जगताप सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक होते.

पण, त्यांच्या ऐवजी अश्विनी जगताप यांना तिकीट देण्यात आलं आहे. अचानक शंकर जगताप यांनी अर्ज भरल्यामुळे कार्यकर्ते गोंधळात पडले. पण लक्ष्मण जगताप यांचा हा डमी अर्ज असल्याचा खुलासा भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments