अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू ; परंडा पोलिसात गुन्हा दाखल


परंडा |

पारगाव शिरस, ता. बीड येथील - भागवत सुरेश गव्हाणे, वय २८ वर्षे, हे दि. २६.१२.२०२२ रोजी १३.००ते १३.३० वा. आष्टा गावाचे एक कि.मी. अंतरावर रोडवरुन मोटरसायकल क्रं एमएच २३ एई १२६५ ही वर बसून जात होते.

 दरम्यान मोटरसायकल क्रं एमएच २५ एटी ५११३ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल ही भरधाव वेगात निष्काळजीपने चालवल्याने भागवत यांना समोरुन धडक बसल्याने भागवत हे गंभीर जखमी होउन उपचार दरम्यान मयत झाले. या आपघातानंतर सदर मोटरसायकल चालक हा आपघात करुन वाहानासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचे वडील - सुरेश संतराम गव्हाणे यांनी दि. २३.०२.२०२३ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम २७९, ३०४ (अ) सह मो.वा.का. कलम १८४,१३४ (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

Post a Comment

0 Comments