तुळजापूर | शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या बापलेकाचा विजेचा शॉक लागून मृत्यूतुळजापूर |

तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे शेतीची मोटर चालू करण्यासाठी गेलेल्या बापलेकाचा विजय चा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला विजेचा शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाला, त्याचा तरुण मुलगा वाचवण्यासाठी गेला असता तोही जागेवरच कोसळला. 

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शेतातील वीज आली. यावेळी मोटार चालू करण्यासाठी गेलेले शरणाप्पा अर्जुन जमादार (वय ५२) आणि त्याचा मुलगा गणेश शरणाप्पा जमादार (वय १६ दोघेही राहणार निलेगाव ता. तुळजापूर) यांचा विजेच्या धक्क्याने जागेवर मृत्यू झाला. आधी  शॉक बसला ते जागेवर कोसळले त्यांना पाहून मुलगा गणेश मदतीसाठी धावला असता तोही जागेवर कोसळला. या घटनेची माहिती मिळताच जमादार कुटुंबियांनी शेतात धाव घेतली. दोघांनाही उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षापासून शेतात पाणी देताना अनेक शेतकरी दगाविल्याच्या घटना घडल्या आहेत.   या घटनेने शहापूर आणि निलेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments