बार्शीत दोन रुपयाचा चेक मिळालेल्या शेतकऱ्याचे आमरण उपोषण सुरू, तहसील कार्यालयासमोर कांदे घेऊन आंदोलन



बार्शी |

बार्शी तालुक्यातील 512 किलो कांद्यामागे दोन रुपये मिळालेले शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी बार्शी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. तहसील कार्यालयासमोर कांदे घेऊन शेतकरी आंदोलन करत आहेत.  राजेंद्र चव्हाण यांच्या दोन रुपयाच्या चेकची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. राजेंद्र चव्हाण यांनी कांद्याला हमीभाव मिळावा, कांद्याला अनुदान मिळावे, निर्यात बंदी उठवावी अशा मागण्यांसाठी आंदोलनाच्या हत्यार उपसले आहे. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापाऱ्याने झाडी बोरगाव येथील शेतकरी राजेंद्र चव्हाण यांना 512 किलोच्या कांद्याला एक रुपया प्रमाणे 512 रुपये आले होते तर सर्व खर्च वजा जाऊन दोन रुपये राहिले होते. व्यापारी खलिफा यांनी दोन रुपयाचा चेक दिला होता. यातून शेतकऱ्यांची थट्टा केली होती. त्यानंतर विधिमंडळातही कांदा दराचा प्रश्न उपस्थित झाला. कृषिमंत्री दादा भुसे यांनी चव्हाण यांना चेक घेऊन नाशिकला बोलावले होते. 

शेतकरी संघटनेकडून शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी बार्शी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. सदर व्यापाऱ्यांनी दोन रुपयाचा चेक दिला होता. त्या दोन रुपयाचे औषध घेऊन मारावे म्हणाले, तरी चेक कामाचा नाही. राज्यातील शेतकऱ्याला प्रति किलो दहा रुपये कांद्याला अनुदान मिळावे. व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी राजेंद्र चव्हाण यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments