उस्मानाबादेत अपघातग्रस्त वाहनातुन १३० किलोअवैध गांजा जप्त ; दोघांवर गुन्हा दाखल



उस्मानाबाद |

अपघातग्रस्त वहनातून १३०.५ कि. ग्र. अवैद्य गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध कारवायांवर आळा घालण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्गावर रात्री गस्त घालत होते. गस्ती दरम्यान १६ फेब्रुवारी रोजी पहाटे ४.३० च्या सुमारास एका विना नोंदणी क्रमांकाच्या, काळ्या रंगाच्या टाटा पंच कारचा त्यांनी संशयावरुन पाठलाग सुरु केला असता ती कार पोलीसांना टाळून अतीवेगात बीडच्या दिशेने जाऊ लागली.

 शिंगोली विश्राम गृहासमोरील राष्ट्रीय महामार्गावर कार चालकाच्या चुकीने ती कार अनियंत्रीत होउन एमएच २५  एएस ८३६७ या ट्रॅक्टर-दुहेरी ट्रेलरला धडकली. या अपघात स्थळी स्था.गु.शा. सह आनंदनगर पोलीसांच्या सपोनि-गोरक्ष खरड यांच्या पथकाने भेट दिली होती. यावेळी त्याकारच्या डिकीमध्ये व मागील आसनावर  ठेवलेल्या ६५ पुड्यांतुन १३०.५ कि.ग्रॅ. वजनाच्या गांजा या अंमली वनस्पतीची अवैध वाहतुक कार चालक दिनेश भवरलाल जाट, वय २१ वर्षे व त्याचा सहकारी शाहरुख जाकीर पठाण, दोघे रा. राजस्थान राज्य हे आंध्रप्रदेशातुन राजस्थानकडे करत असल्याचे आढळले. 

यावर पोलीसांनी नमुद गांजासह कार, २ स्मार्टफोन जप्त करुन दोन्ही आरोपींना अटक केली असुन पोउपनि चंद्रशेखर पाटील यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठा.त एन डी पी एस कायदा कलम ८,२० अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सदरची कामगिरी  पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्था.गु.शाचे पोनि-श्री जाधव, आनंदनगर पो ठा.पोनि श्री. पारेकर, सपोनि- पवार, खरड पोउपनि- संदिप ओव्हळ तसेच आनंदनगर पो.ठा. व स्थागुशा पोलीस अंमलदार यांच्या पथकाने केली आहे.

Post a Comment

0 Comments