छ्त्रपतींच्या जयघोषाने... स्वानंदच्या शिवगगीतांनी जिल्हा परिषद दणाणली…!


सोलापूर - 


सर्वत्र भगवे फेटे…शाहिरा्चा मर्दानी  पोवाडा….! अंगावर शहारे आणणारे  शिवरायांच्या गी तांनी...यशवंतराव चव्हाण सभागृह दणाणून गेले. छ्त्रपतींच्या जयघोषाने जिल्हा परिषद दणाणली…!  मराठा सेवा संघ  जिल्हा परिषद शाखा सोलापूर यांच्यातर्फे 

यशवंतराव चव्हाण सभागृह येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली
 शाखे तर्फे जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांना  कार्यकुशल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

        जिल्हा  परिषदेचे वतीने छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील  छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचे हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करणेत आले.  यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन मुख्य कार्यकारी अधिकारी  संदीप कोहिनकर यांनी केले 

   जिल्हा परिषदेच्या मराठा सेवा संघ शाखा  व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करणेत आले होते. अध्यक्षस्थानी मुख्य  कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर हे होते.   मराठा सेवा संघ शाखेचे वतीने  कार्यकुशल पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला 
पुरस्काराचे सन्मानार्थी...


 मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार,
 गट विकास  अधिकारी मनोज  राऊत( करमाळा), वैदयकिय अधिकारी डॉ.सागर मंगेडकर, शाखा अभियंता  राजेश जगताप,ग्रामविकास अधिकारी  पांडुरंग कागदे,ग्रामसेवक  नागनाथ जोडमोटे,प्राथमिक शिक्षक अर्जुन आवताडे,वरिष्ठ सहाय्यक  प्रदीप सकट ,वरिष्ठ सहाय्यक (लेखा) विलास मसलकर,परिचर  विरभद्र हिरजे यावेळी  जेष्ठ पत्रकारांचा   गौरव करणेत आला.

यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर, माध्यमिक शिक्षणाधिकारी  सुलभा वठारे, कार्यकारी अभियंता पंडित भोसले , कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी,, कार्यकारी अभियंता खराडे,  कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अरूण क्षीरसागर, अधिक्षक अनिल जगताप, लिपिक वर्गीय संघटनेचे संघटक राजेश  देशपांडे, जि प कर्मचारी संघटनेचे विवेक लिंगराज, गिरीष जाधव, अधिक्षक चंद्रकांत होळकर, अधिक्षक सचिन सोनकांबळे, अध्यक्ष,संतोष जाधव,आप्पाराव गायकवाड, प्रमुख उपस्थित होते.



यावेळी स्वानंद ,वडवळ च्या जि प शिक्षकांचा वाद्यवृंद असलेला

" गर्जा महाराष्ट्र माझा" हा शिवगीतांचा बहारदार कार्यक्रम संपन्न झाला 

गर्जा जय जय महाराष्ट्र माझा या राज्यगीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला यामधे शिवचरित्रावर आधारित विविध गीते, पोवाडा यांच्या सादरीकरणाने शिवभक्तांची मने जिंकली


 सुत्रसंचालन महेश  कोटीवाले यांनी केले आभार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी मानले
 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसा ठी 
 सचिन चव्हाण,राम जगदाळे, अनिल जगताप, सचिन जाधव, सचिन साळूंखे, प्रकाश शेंडगे,सुभाष कदम, आप्पासाहेब भोसले, विठल मलपे,संतोष शिंदे, संजय पाटील ,अजित देशमुख, महेश पाटील, विशाल घोगरे, चेतन भोसले, प्रदिप सुपेकर, विकास भांगे, वासुदेव घाडगे, अविनाश भोसले, गणेश साळूंखे, सचिन पवार, उमेश खंडागळे, जयंत पाटील, महेंद्र माने,अभिजीत निचळ, ऋषिकेश जाधव, रवि पाटील, विनायक कदम, सुनिता भुसारे, आश्विनी सातपुते, अनुपमा पडवळे, भारती धुमाळ, सविता मिसाळ यांनी परिश्रम घेतले

Post a Comment

0 Comments