हसन मुश्रीफांविरोधात गुन्हा दाखल होताच समर्थकांचा मुरगूड पोलिस ठाण्यासमोर प्रचंड घोषणाबाजीकोल्हापूर |


विधानसभा निवडणुकीला अद्याप अजून वेळ असताना मात्र दुसरीकडे कागल तालुक्यात हसन मुश्रीफ आणि भाजप जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्यातील संघर्ष दिवसागणिक अधिकच टोकदार होत चालला आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि त्यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. शेकडोंच्या संख्येने एकत्रित येत या कार्यकर्त्यांनी आज मुरगूड पोलिस ठाण्यासमोर मुश्रीफ यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. त्यामुळे तालुक्यामध्ये राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.

दरम्यान, यावेळी वातावरण तणावपूर्ण होत चालल्याने पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवली आहे. मुश्रीफ यांच्या समर्थकांकडूनही त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करणाऱ्या विवेक कुलकर्णीसह इतरांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता परस्पर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. काल (24 फेब्रुवारी) रात्रीही मुरगूड पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांकडून ठिय्या मांडण्यात आला होता.

सदर घटनेचा जाब विचारणाऱ्या घटनेचा जाब विचारण्यात आला होता. मात्र आज (25 फेब्रुवारी) शेकडोच्या संख्येने समर्थकांनी एकत्र येत मुरगूड पोलिस ठाण्यासमोर गर्दी केली आणि प्रचंड घोषणा दिल्या. त्यामुळे आता दोन्ही गटातील वाद दिवसागणिक वाढत चालला आहे. यावर आद्यपही हसन मुश्रीफ आणि संमार्जित घाडगे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

Post a Comment

0 Comments