सोपल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

पांगरी |

दि. ६ फेब्रुवारी रोजी स्व. शोभाताई सोपल सेमी इंग्लिश स्कूल,पांगरी. येथील वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अतिशय जल्लोषाच्या वातावरणात साजरा झाला.
स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून सर्व पालक वर्गासाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनात्मक संदेश पोहोचावा या उद्देशाने " म्होरक्या "या चित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व द्वीप प्रज्वलनाने करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवर अमर देवकर (राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त दिग्दर्शक) अतुल लोखंडे ( मराठी चित्रपट दिग्दर्शक) पांडुरंग सुरवसे (संपादक वृत्तदर्पण व दै. कटूसत्य ) राजू तांबे साहेब (गटशिक्षण अधिकारी बार्शी) विजय गरड ( सोलापूर जिल्हा नियोजन समिती सदस्य दीपक गुंड सर (प्राचार्य.शं.नि.अ.वि. बार्शी)  शेख सर (पांगरी गण केंद्र प्रमुख) मिलिंद देशमुख (उद्योजक भारत पिंपळगाव) रेणुका मोरे (सरपंच पांगरी)  जयश्री चौधरी (सरपंच पिंपळवाडी) नितीन चौधरी( चिंचोली)  गणेश गोडसे( प्रतिनिधी दै. पुढारी) बाबासाहेब शिंदे (प्रतिनिधी दै सकाळ) राहुल गरड (कार्याध्यक्ष जि .प. कर्म. महासंघ जि. सोलापूर ) बाळासाहेब ढेंबरे (शिक्षण परिषद सदस्य बार्शी)  बिभीषण गरड यांचे प्रशालेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय ओपन मार्शल आर्ट मधील यशवी खळाडूंचे मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

स्नेहसंमेलनाची सुरुवात श्री मंगलमूर्तीला वंदन करून म्हणजेच देवा श्री गणेशा या गीताने करण्यात आली यानंतर कार्यक्रमात निरनिराळ्या मराठी, हिंदी व बालगीत लोकगीत कलागुणांचे नृत्य नाटक एक पात्री नाटक मूकनाटक यांचे सादरीकरण करण्यात आले या सर्व कार्यक्रमाच्या सादरीकरण दरम्यान सर्व प्रेक्षक वर्ग अगदी आनंदाने भारावून गेला होता.
कार्यक्रम व्यवस्थित पारपाडण्यासाठी स्नेह संमेलन विभाग प्रमुख  अंजली काळे सोबत रितुजा चव्हाण, पूजा भालेराव, प्रतिभा पालखे, उल्का घावटे,अर्चना जगदाळे,  सारिका कांबळे, मनीषा आबदारे यांनी परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमाचे निवेदन अतिशय बोलक्या पद्धतीने श्री शुभम मिसाळ व प्रशालेच्या सहशिक्षिका चांदणे मॅडम यांनी केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे, पालकांचे व पांगरी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आभार संस्थाध्यक्ष विनायक गरड सर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments