व्हायरल व्हिडिओनंतर गौतमी पाटीलला तरुणाईचा सपोर्ट
सातारा |

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत असलेलं नाव म्हणजे गौतमी पाटील होय. तिच्या डान्समध्ये लावणी कमी आणि अश्लीलपणा जास्त असतो, असा आरोप तिच्यावर झाला. मात्र तिनं सुरवातीच्या काळात केलेल्या चुकांमुळे अजुन ही तिच्यावर टिका करताना लोकं पाहायला मिळतायेत. तीनं याबाबत महाराष्ट्राची माफी मागितली. एवढं करुण सुद्धा तीच्याबाबत बोललं जातयं मात्र गौतमी पाटील च्या सध्या होणा-या कार्यक्रमांना महिला वर्गाचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळतोय. तिचा सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. याबाबत अनेक तरुण तरुणींनी नाराजी व्यक्त केली आहे. साता-यातील तरुण तरुणी गौतमीच्या सपोर्टसाठी पुढं सरसावलेलं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

गौतमी पाटीलचा एक पर्सनल व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याबाबत साताऱ्यातील अनेक तरूण तरूणींनी नाराजी व्यक्त केली आहे. कोणत्याही महिलेचा असा व्हिडिओ व्हायरल करणं मुळात चुकीचं आहे. म्हणूनच साताऱ्यातील तरूणाई तिच्या सपोर्टमध्ये उतरली आहे. सोशल मीडियावर देखील तरूणाई तिच्या सपोर्टमधये उतरली आहे.

Post a Comment

0 Comments