मळेगावमध्ये भर दिवसा घरफोडी ; पांगरी पोलीस स्टेशन हद्दीतील घटना


पांगरी |

माजी सैनिकाच्या घराचे कुलूप, कडी, कोयंडा तोडून भरदिवसा घरातील एक लाख बारा हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना मळेगांव येथे घडली. याबाबत माजी सैनिक तानाजी भिमराव गाडे रा. मळेगांव, ता. बार्शी यांनी पांगरी पोलिसात दिली आहे.

दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० च्या सुमारास फिर्यादी घराला आणि वॉल कंपाऊंडच्या गेटला कुलूप लावून पत्नीसह बार्शी येथे गेले होते. तेथील बाजारहाट करून ते दुपारी पावणेतीनच्या सुमारास घरी परत आले.

वॉल कंपाऊंडच्या गेटचे कुलूप उघडून घराच्या दाराजवळ गेल्यावर, घराच्या दाराला लावलेल्या कुलूपाचा कडी कोयंडा तुटल्याचे दिसले. आत जाऊन पाहिले असता आतील खोल्यांचे तसेच दोन लोखंडी कपाटांचे दरवाजे उघडे असल्याचे दिसले. आणि कपाटात ठेवलेले  ६८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने, चार हजार रुपये किंमतीचे कपडे आणि ४० हजार रुपये रोख रक्कम असे मिळून एक लाख बारा हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले. पुढील तपास पांगरी पोलीस करत आहेत

Post a Comment

0 Comments