बार्शी
बार्शी तालुक्याचे कार्यसम्राट आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नातून नाबार्ड योजनेअंतर्गत तालुक्यातील साकत येथील नवीन पुलाचे काम करण्यासाठी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे..
गेल्या ३० वर्षापासून हा पुल बांधण्यासाठी तेथील ग्रामस्थांची मागणी होत होती.याबाबत आमदार राजाभाऊ राऊत यांच्याकडे तेथील ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसयांच्याकडे आमदार राजाभाऊ राऊत यांनी पाठपुरावा केला होता.त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून वरील पुलाचे काम मंजूर कऱण्यात आले असून निधीची तरतूद करण्यात आली आहे.या पुलामुळे अनेक गाव वाड्या जोडल्या जाणार असून नागरिकांना सोयीचे होणार आहे.
बार्शी मतदारसंघातील निलकंठेश्वर नदीवर साकत हे गाव असल्याने पावसाळ्यात तेथील नागरिकांना दळणवळणाच्या दृष्टीने प्रचंड गैरसोय होत होती.पूरपरिस्थितीत साकत येथील नागरिकांना येणाऱ्या अडचणी आता संपुष्टात येतील.हा पूल अस्तित्वात आल्यानंतर साकत व परीसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल असे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.
सदर महत्वाच्या पुलाच्या कामासाठी मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी आभार मानले, तसेच साकत येथील ग्रामस्थांनी आमदार राजाभाऊ राऊत यांचे आभार व्यक्त केले.
0 Comments