" प्रोत्साहनपर अनुदान त्वरीत जमा करा...!" - सूर्यकांत चिकणेबार्शी |                    

गुळपोळीसह महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50000/₹ अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी  भैरवनाथ शेतमजूर संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत गोविंद चिकणे यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .                   
राजू शेट्टी यांनी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्याचे आवाहन केले होते, त्या आंदोलनास जाहीर पाठींबा देण्यात आला.                             

गुळपोळी विविध कार्यकारी सोसायटीतील सभासद याना व महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना २००८ ते २०२३ या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी एक पेक्षा जास्त वेळेस कर्ज घेऊन परतफेड केली आहे. ज्या शेतकऱ्यांना २०१७ च्या फडणवीस सरकारच्या काळात कर्ज माफी मिळाली नाही,व शेतकऱ्यांना २०२० च्या ठाकरे सरकारने कर्ज माफीचा लाभ मिळाला नाही, त्या सर्व शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान त्वरीत जमा करण्यात यावे या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.           

प्रोत्साहनपर अनुदान त्वरीत जमा न केल्यास यापुढील आंदोलन तीव्र करण्यात येईल असा ईशारा सूर्यकांत चिकणे यांनी दिला, सदरच्या आंदोलनाचे निवेदन पांगरी पोलीस स्टेशनचे पि. एस. आय.बी जे खांडेकर यांनी स्विकारले सदर आंदोलन स्थळी संघटनेचे पदधिकारी शहाजी भिमराव चिकणे, गुलाब हुसेन शेख, तंटामुक्त अध्यक्ष अमोल रामचंद्र चिकणे, नवनाथ रामचंद्र राऊत,विनोद विठ्ठल चिकणे, अमर सुनील चिकणे, पोलीस हवालदार केसरे ,पोलीस हवालदार मेहर,व इतर होमगार्ड पोलीस पाटील बाळकृष्ण दत्तात्रय पिसे व गुळपोळी परीसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments