सोलापूर | आई मला खुप मारलेत.. असं सांगत त्याने प्राण सोडले


सोलापूर |

 सोलापुरातील एका युवकाचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. अमीरखान मौलाली पठाण (वय 34 रा, गरिबी हटाव झोपडपट्टी, विजापूर नाका, सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कामाला जातो म्हणून गेला, परत सकाळी 10.30 च्या सुमारास आला त्यावेळी त्याचे डोके खुप दुखत होते, आई सायरा पठाण यांनी काय झालं, कोण मारले, असे विचारपूस करत असताना आई मला खूप मारले, एवढं उत्तर देऊन, बेशुद्ध झाला. आई सायरा यांनी मुलगा अमीरखान पठाण याच्या डोक्याला विक्स लावले होते, असह्य वेदना होत असल्याने अमीरला ताबडतोब सोलापूर शहरातील
शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी अमीरखान पठाण याचा मृत्यू झाला. प्राण सोडण्या अगोदर आमिर खान पठाण याने सागर, एवढं नाव घेतले होते. त्यावरून पोलिसांनी तपास करत, सागर चंदनशिवे व त्यासोबत असलेल्या इतर दोघांवर विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे 19 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा
खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

जुन्या भांडणाचे राग मनात धरून अमीरला मारहाण झाल्याचा गुन्हा दाखल -

अमीरखान पठाण हा वेठबिगारी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. मोठा भाऊ, वाहिनी, आई यांसोबत विजापूर नाका झोपडपट्टी येथे राहावयास होता. 16 फेब्रुवारी रोजी, हाताला काहीतरी काम मिळेल यासाठी तो घरातून गेला सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गेला. विजापूर नाका रोड वरील एका चौकात गेला. त्याठिकाणी अमीरखान पठाणला जुन्या भांडणाचा राग मनात धरून त्याला तीन जणांनी बांबूने डोक्यावर मारहाण केली. बांबूचा मार डोक्यात अंतर्गत लागला होता. वेदना सहन करत घरी परत आला, आणि आईला मला खूप मारलं आहे, एवढ सांगितले आणि त्याची दातकिली बसली, व बेशुद्ध झाला. डोकं दुखत आहे म्हटल्यावर आई सायरा पठाण यांनी विक्स लावले होते. 16 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास भाऊ नासीर पठाण यांनी आमिरला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 च्या सुमारास आमिरचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 19 फेब्रुवारी रोजी नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजापूर नाका पोलीस ठाण्यात तीन
जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला.

मृत्यू होण्या अगोदर आमिरने सागर असे नाव सांगितले
होते-
16 फेब्रुवारी रोजी ज्यावेळी आमिर हा घरी आला,त्यावेळी त्याने आई मला खूप मारले आहेत.... कोण मारले, यबाबत विचारणा केली असता त्याने, सागर, सागर असे नाव सांगितले होते. यावरून अमीरच्या नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. आमिर खान पठाणने मृत्यू होण्याअगोदर काहीही सविस्तर सांगितले नव्हते. सागर एवढया नावावरून तपास लावला.खुनाचा नेमकं कारण शोधून काढले. आमिरखान पठाणला जुन्या भांडणाचा राग मनात धरून, सागर चंदनशिवें व इतर तिघांनी मारहाण केली अशी नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. अमीरच्या आईने माध्यमांना माहिती देताना सांगितले, माझ्या मुलाच्या मारेकऱ्यांना अटक करून कडक कारवाईची मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments