गौडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व रोगनिदान शिबिर व रक्तदान शिबिर संपन्न


बार्शी |

गौडगांव ता. बार्शी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गरोदर माता तपासणी, उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी, जागरूक पालक सदृढ बालक मोहीम शुभारंभ, रक्तदान शिबिर व सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 
      
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच स्वाती पैकेकर, उपसरपंच उमा शिंदे, यांनी केले. यावेळी लक्ष्मण संकपाळ,  राहुल भड, नागेश काजळे, जीवन भड, भैय्या मगर उपस्थित होते.

 सर्वरोग निदान शिबिरामध्ये १६८ रुग्णांची तपासणी करण्यात आली, ४४ गरोदर माताची तपासणी करण्यात आली व कॅल्शियम आयन फॉलिक ऍसिडच्या गोळ्या देण्यात आल्या, ३८ रक्तदाते यांनी रक्तदान केले, उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी मध्ये ३५ उच्च रक्तदाब १८ मधुमेह रुग्णांचे निदान करण्यात आले व औषधोपचार देण्यात आले, जागरूक पालक व सुदृढ बालक मोहिमेअंतर्गत जि. प. शाळा गौडगाव या ठिकाणी बालकांच्या तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली गौडगाव येथे आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर संपन्न झाले.

Post a Comment

0 Comments