लग्न जमवविण्याच्या नावाखाली शेकडो लग्नाळू युवकांची आर्थिक फसगत



रॅकेट उघडकीस मुख्य आरोपी महीलेसह तिघांविरुध्द गुन्हा दाखल 

बार्शी -  लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या व्यक्तींना मुलींचे फोटो दाखवून स्वतः लग्न लावून देण्याची हमी देत अनेकांची अर्थिक लुबाडणूक करून फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा बार्शीत पर्दाफाश झाला आहे. 

याबाबत तालुका पोलीसात अंजली श्रीमंत धावणे ( रा.सुभाष नगर  बार्शी ), कैलास विठ्ठल नायकंदे , रा.पाटसांगवी ) रामा खैरे (रा.पाचपिंपळा ता .परांडा ) यां तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती की अंजली धावणे इतर आरोपी व महीला पुरुष एजंटला हाताशी धरून या महिलेने गेल्या वर्षाभरापूर्वी अनरजिष्टर सुशिक्षीत महिला वधू - वर मराठा मंडळ स्थापन करून या माध्यमातुन लग्नाळु मुलांचे वयाचे दाखले घेऊन लग्न जमवण्याचे काम सुरु केले होते. यासाठी सोलापूर जिल्हयासह उस्मानाबाद बीड भुम परांडा आदी गावात शहरात सुमारे २० हून अधिक महिला पुरुष एजंट नेमले होते. यातुन अनाथ आश्रम मधील मुली असल्याचे सांगुन शेकडो युवकांकडुन नोंदणी फि म्हणून ५ हजार ते २५ हजार रुपये एजंट मार्फत रक्कम घेतल्याचे पालकांतुन सांगण्यात आले.

शनिवार दि २८ रोजी बार्शी बायपास रोडवरील किलचे यांचे अर्णराज पॅलेस येथे वधूवर परिचय मेळावा भरविण्यात आला होता . दरम्यान यावेळी हजारोंच्या संख्येनी लग्नाळू युवक पालकांसह जमले होते त्यापैकी आज काही युवकांचे लग्न होईल असे सांगण्यात आले होते . मात्र या मेळाव्यात एकही मुलगी आली नसल्यांने फसवेगिरीची पोलखोल झाल्याने पालकांचा संताप अनावर झाला.

 दरम्यान अंजली धावणे या महिलेसह सर्व महीला व पुरुष एजंटला धारेवर धरले , लग्नाळू युवकांची पालकांची एकच धांदल उडाली. यावेळी काही वेळात पोलीस दाखल झाले. पोलीस आल्याचे पाहुन काही एजंटानी पॅलेसच्या मागुन पळ काढला . उपस्थीत वधू वर सुचक प्रमुख अंजली धावणे यांचेकडे व पालकांकडे पोलीसांनी विचारपूस केली. अनेक पालकांनी आजवर लग्न जमविण्याच्या नावा खाली मोठ्या प्रमाणात पैसे रक्कम संबधित मुख्य आरोपी महीलेसह एजंटाना दिल्याचे सांगितले. याबाबत पोलिसांनी अंजली धावणे सह 5 ते 6 महीला एजंटांना ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

0 Comments