ख्रिश्चन समाजाचे आचरण, प्रसारण व पालन करणे हा आमचा संविधानिक हक्क आहे- राकेश नवगिरे


सोलापूर |

ख्रिश्चन समाजाचा भव्य निषेध मूक मोर्चा १ फेब्रुवारी 2023 ला सोलापुर शहरात होत आहे.

ख्रिश्चन धर्मीय लोकांवर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराबाबत, त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील आटपाटी येथील पास्टर संजय गिळे प्रकरण, पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील प्रकरण यासंदर्भात चुकीची व दिशाभूल करणारी माहिती जाणीवपूर्वक पुढे आणून नाहक ख्रिश्चन धर्मीय लोकांवर एकाप्रकारे दबाव तंत्र आणून अन्याय व अत्याचार होताना दिसून येत आहे. असे निदर्शणास आलेले आहे. वास्तविक पाहता त्यांच्यावर भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद १५ अन्वयेत धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. 

तसेच अनुच्छेद २५ अन्वये सद्सद विवेक बुध्दीचे स्वातंत्र आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण आचारण व प्रसार करण्याचा धर्म स्वातंत्र्याचा हक्क भारतीय राज्य घटनेने भारतीय नागरीकांना दिलेला आहे. तसेच अनुच्छेद २६ अन्वये धार्मिक व्यवहाराची व्यवस्थापन पाहण्याचे स्वातंत्र आहे. असे असताना कोणलाही इजा न पोहोचवता अगर कोणतेही अंधश्रध्दा अगर प्राणी बळी न करता शांततेच्या व सभ्यतेच्या मार्गाने ख्रिश्चन धार्मिक व्यक्ती नेहमीच मार्गक्रमण करत आलेला आहे. तरी ख्रिश्चन धर्मीय व्यक्ती, धर्मगुरू व धार्मिक स्थळे वर होणारे हल्ले व दबावतंत्र थांबविण्यात यावे व त्याबाबतीतची सखोळ चौकशी करून संदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई संबंधीतांवर व्हावी याकरिता संपूर्ण सोलापूर शहर व जिल्ह्यातील समस्त ख्रिश्चन बांधवांकडून भव्य निषेध मूक मोर्चा चे आयोजन केले असून येथे १ फेब्रुवारीला येत्या बुधवारी हा मोर्चा सोलापूर शहरातील मसिहा चौक, सोलापूर येथून जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर इथपर्यंत जाणार असून, जवळपास २० हजार बांधव या मोर्चात सोलापूर शहर व जिल्ह्यातून उपस्थित राहणार आहेत व जिल्हाधिकारी यांना निवेदन  देणार आहेत, बार्शी शहरातून मोठ्या प्रमाणातून ख्रिश्चन समाज या मोर्चाला जाणार आहे असे ख्रिश्चन एकता मंच युवा प्रदेशाध्यक्ष राकेश नवगिरे यांनी सांगितले व यासंदर्भात बार्शी शहरात बैठक झाली यावेळी बार्शी तालुक्यातील सर्व धर्मगुरू वर्ग, पंच कमिटी तरुण संघ व कुर्डूवाडी येथील धर्मगुरू वर्ग व तरुण संघ हे या बैठकीस उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments