साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृहाचे भूमिपूजन सोहळा


वैराग |

 वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील अण्णाभाऊ साठे नगर येथे सुमारे 85 लाख रुपये खर्चून सभागृह बांधण्यात येणार असून आज उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर व प्रभाग क्रमांक 11 चे नगरसेवक श्रीशैल्य भालशंकर नगरपंचायतील नगरसेवक यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

त्यानंतर अण्णाभाऊ साठे सभागृह संदर्भात सतत पाठपुरावा करणारे नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांचा ज्येष्ठ दलित नेते भारत ठोंबरे यांनी शाल श्रीफळ हार घालून सत्कार केला यावेळी प्रा. खंडेराया घोडके दिलीप जाधव, संदिपान कसबे, सामाजिक कार्यकर्ते संगमेश्वर डोळसे, लखन कांबळे, आकाश काळे, योगेश जाधव, नगरसेवक अतुल मोहिते नगरसेवक, गोविंद ताटे, रोफभाई बागवान, नगरसेवक दादासाहेब काळोखे, आलंम पठाण, अनिल सकट, अजय काळे, आकाश जाधव, सैफन शेख,श्रीनाथ अहिरे संतोष बिर्गे, संतनाथ पवार, अनिल सकट, सह अण्णाभाऊ साठे नगर, सिध्दार्थ नगर व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. शेवटी मल्हारी ठोंबरे यांनी उपस्थित आभार मानले.

Post a Comment

0 Comments