श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेचे वतीने स्वच्छता अभियानाचे आयोजन

बार्शी |

दिनांक ३०/०१/२०२३ वार सोमवार रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथीनिमित्त स्वच्छता अभियान श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी या संस्थेच्या वतीने सर्व शाखांतर्गत ही मोहीम राबविण्यात आली होती.

प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे कार्यकारीणी सदस्य व्ही.एस. पाटील व सी.एस.मोरे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संस्थेचे सचिव पी.टी.पाटील, संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे, संस्था सदस्य बी.के.भालके,श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अब्दुल शेख, बी.पी. कॉमर्सचे प्राचार्य डॉ. एस.के.पाटील, महाराष्ट्र विद्यालयाचे प्राचार्य जी.ए.चव्हाण, उपप्राचार्य एल. डी.काळे,कि.कौ.प्रमुख प्रा.किरण गाढवे,माजी प्राचार्य डी.बी. पाटील,माजी प्रा.अशोक कदम, अनिल पाटील हे उपस्थित होते.

त्यानंतर सर्व परिसराची स्वच्छता ज्या त्या विभागामार्फत सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामार्फत करण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आजचा दिवस नो व्हेईकल डे म्हणून सर्व संस्थेच्या सर्व शाखांतर्गत राबविण्यात आला.
या कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments