बार्शीच्या बनावट औषध निर्मिती प्रक्रियेतील इतरही आरोपी शोधा...अन्यथा २३ जानेवारीला मंत्रालयासमोर बोंबाबोंब आंदोलन.. शंकर गायकवाड


बार्शी |

११ जानेवारी, बार्शी येथे दिनांक ५ जानेवारी २०२२ रोजी बनावट रासायनिक कृषी निविष्ठा किंवा औषधे बनवणाऱ्या पाटील प्लॉट, अलीपुर रोड येथील बागवान बंगल्यावर कृषी विभागाने टाकलेल्या धाडीत बनावट औषधांचा ७६ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व त्यावेळी चालक हनुमंत परमेश्वर चिकणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला परंतु त्या व्यवसायास कच्चामाल पुरवणारे व त्याची विक्री करणारे असे अनेक आरोपी मोकाटच असल्यामुळे आज विविध शेतकरी संघटनांच्या वतीने ग्रामीण पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी, सोलापूर यांना निवेदने देण्यात आली, त्यावेळी बोलताना शेतकरी संघटनेचे राज्यअध्यक्ष शंकर गायकवाड म्हणाले की, लवकरात लवकर चौकशी करून इतरही मोकाट आरोपींना जेलबंद केले नाही तर दिनांक २३ जानेवारी २०२२ रोजी विविध शेतकरी संघटनांच्या वतीने मंत्रालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बार्शी तालुका युवक अध्यक्ष शरद भालेकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे सचिन आगलावे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments