हत्तीज ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार राऊत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश




बार्शी |

बार्शी तालुक्यातील हत्तीज ग्रामपंचायत मधिल नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा सत्कार समारंभ आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते पार पडला,तसेच हत्तीज विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व सभासद यांनी आमदार राजाभाऊ राऊत उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
     ‌
बार्शी तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार राजाभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळविले.आज हत्तीज येथे पार पडलेल्या कार्यक्रमात नुतन सरपंच मुक्ताबाई शहाजी जाधव व उपसरपंच धनाजी दशरथ चाबुकस्वार,तंटामुक्ती अध्यक्ष प्रवीण पाटील,सदस्य शर्मिला लक्ष्मण सापते,कोमल अशोक कुटे,संगीता नारायण जाधव,सुग्रीव भिवा बनसोडे, शेषाबाई भगवान बनसोडे तसेच पॅनेल प्रमुखांचा सत्कार करण्यात आला.बार्शी तालुक्यात विकास कामांसाठी माझे नुतन सरपंच,सदस्य व ग्रामस्थांना नक्कीच पाठबळ असणार आहे.गावच्या सर्वांगीण विकासासाठी एकता अबाधित ठेवावी,काही अनुभवी तर काही नवख्या सदस्यांनी एकमेकांशी चर्चा करून गावच्या विकासासाठी प्लॅन तयार करावेत तो कार्यक्रम आपण एकत्रित पणे राबवु असे आमदार राजाभाऊ राऊत यांनी मत व्यक्त केले.
   
बार्शी तालुक्यातील हत्तीज येथील सोपल गटाचे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हा.चेअरमन अरुण पाटील, अशोक कुठे, दशरथ चाबुकस्वार, प्रशांत खोबरे, रंजना आडगळे, मंदाकिनी पाटील,गणपती जाधव,सोपल गटाचे पार्टी प्रमुख विकास पाटील सर,कार्यकर्ते ब्रह्मदेव पाटील,विजयकुमार पाटील,हनुमंत जाधव,राजाभाऊ पाटील,राजकुमार जाधव,माऊली मंडलिक,सागर बनसोडे,प्रशांत पाटील,दिनेश पाटील,सदाशिव पवार,अक्षय सापते,पिनू भोसले,शरद सौदागर,गोविंद सापते यांनी विकासाच्या मुद्द्याला पाठिंबा देत आमदार राजाभाऊ राऊत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.प्रसंगी आमदार राजाभाऊ राऊत यांनी सर्वांचे स्वागत केले.आपण सर्वांना सोबत घेऊन करत असलेल्या विकास कामांमुळे प्रभावीत होऊन अनेक पदाधिकारी कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत ही अत्यंत समाधानकारक बाब आहे असे राजाभाऊंनी सांगितले. यावेळी गावातील प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments