दहा हजाराची लाच घेताना होमगार्डला रंगेहाथ पकडले ; लाचलुचपत प्रतिबंध पथकाची कारवाई


सोलापूर |

 तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रूपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती १० हजार रूपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने एका होमगार्डला रंगेहाथ पकडले आहे.

दत्तात्रय आण्णाराव मोटे पद होमगार्ड मोहोळ पथक (रा. नांदगांव ता. मोहोळ जि.सोलापूर) असे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या होमगार्डचे नाव आहे.

यातील तक्रारदार यांचे पती विरुध्द दाखल असलेल्या गुन्हयात तक्रारदार याचे पती अटकेत असुन त्यांना लवकर जामीन करुन देण्याकरिता तसेच सदर गुन्हयामध्ये तक्रारदार यांची गाडी न दाखविण्याकरिता साहेबांच्या नावाने १५ हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती १० हजार रुपये स्विकारण्याचे मान्य करुन ती लाच रक्कम स्विकारलेवरुन आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Post a Comment

0 Comments