मालट्रकने दुचाकीला फरफटत नेल्याने वृध्द दाम्पत्य जागीच ठार


सातारा |

 बजरंग काटकर हे पत्नीसोबत दुचाकीवरून कोरेगावला येत होते. ऊस वाहतूक करणारी ट्रॉली कुमठे फाट्याच्या दिशेने निघाली होती. ट्रॅक्टर ट्रॉलीला ओव्हरटेक करत निघालेल्या भरधाव मालट्रकने काटकर दाम्पत्याच्या दुचाकीला समोरून भीषण धडक दिली. धडक दिल्यानंतर दुचाकीला सुमारे वीस-पंचवीस फूट फरफटत नेले. त्यात काटकर दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

अपघाताची माहिती मिळताच कोरेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी काटकर दाम्पत्याचे मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेले. अपघातानंतर मालट्रकचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. ग्रामीण रुगणालयात काटकर दाम्पत्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी अपघातग्रस्त मालट्रक ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याच्या आवारात लावला आहे. या अपघाताची नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments