मंद्रूप येथे दोघांचा अज्ञात कारणावरून मृत्यू; मंद्रूप पोलिसात सीआरपीसी नोंद


सोलापूर |

फिर्यादी कटप्पा आनंद काळे( वय वर्षे 23 )राहणार इंदिरानगर मंद्रूप,तालुका दक्षिण सोलापूर यांनी मंद्रूप पोलीसात दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवार,दि.5 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारस मंद्रूप येथील चांभार गल्ली येथे पारूबाई पांडुरंग व्हनकळस वय वर्षे 38 राहणार चांभार गल्ली,मंद्रूप ह्या अज्ञात कारणाने मयत झाली आहे व 2) सुनील धर्मा पवार वय वर्षे 40 वर्ष राहणार सेवालाल नगर मंद्रूप तालुका दक्षिण सोलापूर यांने अज्ञात कारणावरून दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

यासंदर्भात मंद्रूप पोलीस ठाण्यात  अकस्मात मयताची नोंद झाली असून अधिक तपास मंद्रूप पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments