...नाहीतर मी आत्महत्या करेल ; उर्फी जावेदचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्यसोशल मीडियातील वादग्रस्त अभिनेत्री ऊर्फी जावेद  आणि भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचातला वाद टोकाला गेलाय. जिथे सापडेत तिथे उर्फी जावेदला चोप देण्याचा इशारा चित्रा वाघांनी दिलाय. भर रस्त्यावर अतरंगी कपडे घालून फिरणाऱ्या ऊर्फी जावेदविरोधात चित्रा वाघांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवून अटक करण्याची मागणी केली. त्यावर ऊर्फीनं कारवाईसाठी चित्रा वाघ यांना खुलं आव्हान दिलं होतं. यावरुन आता चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या आहेत.  

यानंतर उर्फीने आता पुन्हा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये उर्फीने गंभीर विधान केले आहे. “राजकीय नेत्यांविरोधात वक्तव्य करणं माझ्यासाठी घातक ठरू शकते, हे मला माहीत आहे. पण, ते मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहेत. त्यामुळे एकतर मी आत्महत्या करेन किंवा त्यांच्याविरोधात बोलून माझा खून करुन घेईन. पण या सगळ्याची सुरुवात मी केलेली नाही. मी कोणाबरोबरही काहीच चुकीचं वागलेले नाही. काहीही कारण नसताना त्यांनी या सगळ्याची सुरुवात केली आहे”, असं गंभीर विधान उर्फी जावेदने केलं आहे.


Post a Comment

0 Comments