पंढरपुरात नववीच्या मुलीने पेपर लिहिता लिहिता घेतला अखेरचा श्वास ; मेंदू विकाराच्या झटक्याने जागीच गतप्राणपंढरपूर |

पंढरपूरच्या अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता तिसरीमधील अनन्या भादुले (वय 9) वर्गामध्ये पेपर लिहीत होती. त्यावेळी अचानक तिला मेंदूविकाराचा झटका आल्याने ती जागीच
गतप्राण झाली. घाबरलेल्या वर्ग शिक्षकांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. प्राथमिक माहितीनुसार अनन्याला ब्रेन हैम्रेज झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. पंढरपूरच्या अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये ही दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी अनन्या सकाळी 8 वाजता परीक्षा देण्यासाठी शाळेत आली होती.

आज मराठीचा पेपर होता. अनन्याने संपूर्ण पेपर सोडविला. पेपर सुटण्यास काही वेळ शिल्लक असताना अनन्याला अचानक झटका आला. तिने हातपाय वाकडे केले. तिची अवस्था पाहून शिक्षकांनी तिला उचलून उपचारासाठी नेले. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. अनन्याची तब्येत गेल्या दोन दिवसांपासून ठीक नव्हती. तिला ताप येत होता अशी माहिती मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments