वैराग बसस्थानकामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय करावी ; आम आदमी पार्टीचे आगारप्रमुखास निवेदनवैराग |

वैराग बस स्थानकामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय करा अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने बार्शी आगार प्रमुख स्मिता मिसाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अशा आशयाचे निवेदन १७ जानेवारी रोजी त्यांना देण्यात आले.

वैराग हे पंचक्रोशीतील सुप्रसिद्ध असे बाजारपेठ आहे. शाळा कॉलेज व तत्सम कामासाठी महिला व मुलींची बस स्थानकामध्ये मोठ्या संख्येने येजा असते. वैराग बस स्थानकामध्ये असणारे स्वच्छतागृह बंद अवस्थेत आहे, याशिवाय बस स्थानकामध्ये घाणीचे साम्राज्य ही पसरलेले आहे. बस स्टॅन्ड चा परिसर स्वच्छ करून महिलांसाठी स्वच्छतागृहाची सोय करावी अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदनाद्वारे आगारप्रमुखाकडे करण्यात आली आहे.

यावेळी आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रभाकर क्षिरसागर, कार्याध्यक्ष संतोष धावरे, वैराग विभागाध्यक्ष ताजुद्दिन बाबा शेख, महेंद्र निंबाळकर, प्रफुल्ल भालशंकर आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments