सोलापूर | शोभादेवी नगरातून हरवलेल्या इरफानचा मृतदेह हैद्राबाद मध्ये आढळलासोलापूर |

नई जिंदगी येथील शोभादेवी नगरात राहणाऱ्या २५ वर्षीय बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह मंगळवारी  हैद्रबाद मधील रेल्वे पठरीवर आढळला आहे. इरफान युसुफ शेख ( वय २५, रा. शोभादेवी नगर, मजरेवाडी, नई जिंदगी, सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

 इरफान हा २९ जानेवारी रोजी घरातून पहाटे ३ वाजता नैसर्गिक विधीसाठी बाहेर पडला. त्या नंतर तो परत आलाच नाही. त्याचा, मित्र, नातेवाईक यांनी शोध घेतला असता तो मिळुन आला नाही. यामुळे त्याचे वडील युसुफ इब्राहिम शेख यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात इरफान बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती. परंतु मंगळवारी इरफान याचा मृतदेह हैद्राबाद येथील सिकंदराबाद येथून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वेच्या रुळावर त्याचा मृतदेह सापडला आहे. इरफान शेख हैद्राबाद परिसरात कसा गेला? का गेला? याचा शोध सध्या पोलीस करत आहे. इरफान शेख यांचे मृत्यूची बातमी समजतात परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

0 Comments