राष्ट्रीय मतदार जनजागृती अभियानांतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन



औरंगाबाद |


राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त जनजागृती
कन्नड शहरातील जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळा कन्नड नं.१ येथे राष्ट्रीय मतदार जनजागृती कार्यक्रमा अभियानांतर्गत मतदानाविषयी लोकांना माहिती दिली. भारत देश विविध परंपरा आणि नटलेला असताना प्रत्येक गोष्ट गुण्या गोविंदाने एकमेकांना सोबत घेऊन होत असते. 

अठरा वर्षे पूर्ण होताच प्रत्येक युवा वर्गाने मतदान म्हणून मतदार यादी मध्ये आपलं नाव नोंदणी करणे गरजेचे असते. लोकशाही बळकट करण्यासाठी, लोकशाही मार्गाने आपले भारतीय राज्यघटना आणि त्याद्वारे सदस्य, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य,राज्यपाल राष्ट्रपती इत्यादी सर्व ठिकाणी आपल्या हक्काचे लोक प्रतिनिधी पाठवण्याचा काम करतो.

 म्हणून प्रत्येक नागरिकांनी वय वर्ष अठरा पूर्ण होतात मतदान नोंदणी करून घेणे. आपलं अमूल्य मत पैश्यातुन विक्री करू नका. चला तर आपण मतदार होऊन भारत देश बळकट करू या अशी शपथ यावेळी मतदार नोंदणी अधिकारी बीएलओ सतीश कोळी सह जुनैद कादरी,जुबैर शेख,संजय चव्हाण यांच्या सह 186/187/188/189 सर्व बीएलओ व जेष्ठ नागरिक,नवीन मतदारासह  सबा अन्सारी,अर्चना पाटील, सुवर्णा गायके,कल्याण राऊत, इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments