शेतकरी संघटनेने केले मुंबईत आंदोलन...आज ठेचा भाकरी खाऊन आंदोलन केले..पुन्हा मात्र ठेचून काढू..शंकर गायकवाड(प्रदेशाध्यक्ष,शेतकरी संघटना)


मुंबई |

२४ जानेवारी, मुंबईतील आझाद मैदानावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली विविध जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांनी आझाद मैदानामध्ये मिरचीचाठेचा भाकरी खाऊन आंदोलन केले. या आंदोलनानंतर पीकविमा कंपनीने लेखी आश्वासन दिले, तर पोलिसांनी पाच जणांचे शिष्टमंडळ कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना रात्री दहा वाजता भेटवल्यानंतर त्यांनीही सर्व मागण्यांची पूर्तता लवकरच केली जाईल असे आश्वासन दिले, म्हणून आजचे आंदोलन आम्ही थांबवत असलो तरी मागण्यांची पूर्तता पंधरा दिवसात न झाल्यास संबंधित मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलने करून पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना ठेचून काढू असा खणखणीत इशाराही गायकवाड यांनी यावेळी बोलताना दिला. ५ जानेवारी रोजी बार्शी येथे अलीपुर रस्त्यावरील, पाटील कॉलनी, बागवान बंगला येथे कृषी विभागाने धाड टाकून बेकायदेशीर सुरू असलेल्या इकोमेक ऍग्रो प्रा. लि.या कंपनीच्या बनावट रासायनिक औषधांची ७६ लाख रुपये मुद्देमालाची जप्ती करून त्याचा चालक हनुमंत परमेश्वर चिकणे याचेवर गुन्हा नोंदवला परंतु या कंपनीला कच्चामाल पुरवठा करणारे व त्याची राज्य व राज्याबाहेर विक्री करणारे आणि त्याच्याशी निगडित असलेले सर्व साथीदारांना ही आरोपी करून अटक करणे गरजेचे असल्यामुळे हा तपास एस.आय.टी. कडे देण्यात यावा, खरीप सण २०२० चा कंपनीने मंजूर केलेला काढणीपश्चातचा तर २०२२ चा कमी मिळालेला व न मिळालेला पिकविमा तात्काळ द्या, फळबाग व अतिवृष्टीचा उर्वरित निधी तात्काळ द्या आदी मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी सतीश मोरे, शरद भालेकर, हनुमंत यादव, विशाल लोखंडे, शेखर लावंड, कबीर लावंड, गणेश यादव, कृष्णा यादव, शुभम यादव, बाळू यादव, गोटू पाटील, बजरंग चौधरी, दयानंद चौधरी, अमर पाटील, अशोक गिरमकर, श्रीहरी गायकवाड, सिद्धांत चौधरी, सुनील चौधरी, भारत चौधरी, अमर चौधरी, मधुकर चौधरी, सुभाष चौधरी, आकाश गायकवाड, आकाश पाटील, राजाभाऊ फरताडे, समाधान पाटील आदीसह बहुसंख्य शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.

फोटो ओळी: छायाचित्रात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड व शेतकरी दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments