कवीवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार राजा माने यांना प्रदान


पुणे |

ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स आणि स्वानंद महिला संस्थेच्यावतीने दिला जाणारा कवीवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार ज्येष्ठ संपादक राजा माने यांना काल चिंचवड येथे झालेल्या विशेष सोहळ्यात संत साहित्याचे अभ्यासक व माजी आमदार उल्हासदादा पवार व आ.उषाताई खापरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. माने यांच्या "ज्यांनी आभाळ कवेत घेतलं.." या पुस्तकाबद्दल हा पुरस्कार देण्यात आला.
चैतन्य सभागृहात पार पडलेल्या जैन कॉन्फरन्सचे देशभरातील पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा.सुरेखा कटारिया, डॉ.सुनिता बोरा, कल्पना कर्नावट, सविता सवणे, साहित्यिक पुरोषोत्तम सदाफुले, अविनाश मोदी, डॉ.रुचिरा मोदी, मनोहरलाल लोढा, ललित कटारिया आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

Post a Comment

0 Comments