बार्शीपुत्र तहसीलदार धीरज मांजरे यांचा विशेष सत्कार


बार्शी |

बार्शी तालुक्यातील देवगाव चे सुपुत्र वाशिम जिल्ह्यातील कारंजाचे तहसिलदार धीरज मांजरे यांनी मतदान नोंदनी प्रक्रियेत उत्कुष्ठ कामगिरी केल्याबदल मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र शासन श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते आयोजित एका कार्यक्रमात मुंबई येथे सन्मानित करण्यात आले. 

२०२२ मध्ये मतदार यादीचे अद्यावतीकरण, तक्रारीचे निवारन, राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम या कार्यात जातीने लक्ष देऊन उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मुख्य निवडणूक आयोग मुंबईकडून मतदार दिनाचे औचित्य साधून मुंबई येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राज्यस्तरीय उत्कृष्ट मतदानअधिकारी म्हणून कारंजाचे तहसीलदार धीरज मांजरे यांना स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देऊन मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्य निवडणूक आयोगातील मान्यवरांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments