पंचायत समितीच्या माजी उपसभापतीवर प्राणघातक हल्ला, प्रकृती गंभीरसातारा |

 तरुणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात सातारा पंचायत समितीचे माजी उपसभापती जितेंद्र सावंत हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे लिंब (ता. सातारा) गावात तणावाचे वातावरण आहे. 

पंचायत समितीच्या माजी सभापतीवर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती मिळताच सातारा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत गावात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी पथक रवाना केले. या घटनेमुळे सातारा तालुक्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. जितेंद्र सावंत यांनी पंचायत समितीचे उपसभापती तसेच जिल्हा परिषद सदस्य म्हणून केलेले काम उल्लेखनीय होते.

Post a Comment

0 Comments