पांगरी पोलीस ठाण्याचे एपीआय नागनाथ खुणे यांच्यासह तिघांना ३० हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले



बार्शी |

 गुन्ह्यामध्ये नॉमिनल अटक करून जमिनावर सोडण्यासाठी तीस हजार रुपयाची लाच घेणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकासह एका पोलीस शिपाई यांनी चालकास लाचलुचपत प्रतिबंधक  विभागाने रंगेहात पकडले आहे.

नागनाथ जयजयराम खुणे, वय ३५ वर्षे, पद सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी पांगरी पोलीस स्टेशन,  सुनिल पुरभाजी बोदमवाड वय ३१ पद पोलीस शिपाई नेमणूक पांगरी पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण,  हसन इस्माइल सय्यद वय ६९ व्यवसाय चहा कॅन्टीन रा. पांगरी ता. बार्शी जि. सोलापूर
यातील तक्रारदार यांचे तसेच त्यांचे भावाविरुध्द पांगरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असुन सदर दाखल गुन्हयात तक्रारदार व त्यांचा भाऊ या दोघांचा मा. न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजुर केला आहे. 

सदर गुन्हयात नमुद तक्रारदार तसेच त्याच्या भावाला नॉमीनल अटक करुन जामीनावर सोडण्याकरीता सदर गुन्हयाचे तपासी अधिकारी आलोसे क्र. १ व त्यांचे दप्तरी आलोसे क्र.२ यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रत्येकी १५००० रुपये प्रमाणे ३०००० रुपये लाचेची मागणी करुन सदर लाच रक्कम आरोपी क्र.३ यांचेकडे देण्यास सांगितले व आरोपी क्र. ३ यांनी सदर लाच रक्कम स्विकारल्याने नमुद तीनही आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सदरची कारवाई गणेश कुंभार, पोलीस उपअधीक्षक एसीबी, सोलापूर, उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक, एसीबी, सोलापूर. पोलीस अंमलदार पोह शिरीषकुमार सोनवणे, पोना प्रमोद पकाले, श्रीराम घुगे, पोकॉ सलीम मुल्ला, गजानन किणगी चापोना उडानशिव, चापोशि शाम सुरवसे सर्व नेमणूक एसीबी सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे

Post a Comment

0 Comments