ट्रॅक्टरला चुकवण्याच्या नादात ट्रक घुसला हॉटेलमध्ये ; सहा दुचाकीचा चुराडा ट्रॅक्टर चालकासह सहा जण गंभीर जखमीबीड |

बीड जिल्ह्यात भीषण अपघाताची घटना घडली आहे. बीड जिल्ह्यातून जाणारा धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर मंजरी फाटा येथे एक ट्रक ट्रॅक्टरला चुकवण्याच्या नादात तो ट्रक चक्क एका हॉटेलमध्ये घुसला आणि हॉटेलच्या समोर असलेल्या सहा दुचाकीचा चुराडा केला त्यामुळे दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर हॉटेलचेही नुकसान झाले आहे. अपघाता दरम्यान ट्रॅक्टर ड्रायव्हर सह चार जण जखमी झाले आहेत. 

त्याचबरोबर जे ट्रॅक्टर बीड कडून येत होते त्या ट्रॅक्टरचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परंतु याच्यामध्ये जीवित हानी कुठलीही झालेली नाही. 

 बीडकडून मंजरीकडे जाणारे ट्रॅक्टरला चुकवण्याच्या नादात ट्रक चालकाने चक्क सहा मोटरसायकलचा चुराडा केला आहे. हॉटेलचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर हॉटेलमध्ये बसलेले नागरिक यांनी सावधगिरी बाळगत व आपला जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला व आपला जीव वाचवला.

Post a Comment

0 Comments