पोलीस कॉन्स्टेबलचा रुग्णालयाबाहेर डांस करतानाचा व्हिडीओ वायरलसोलापूर |

सोलापूर शहरातील गंगामाई हॉस्पिटल समोर एका पोलीस कॉन्स्टेबलने डांस करतानाच व्हिडीओ वायरल झाला आहे .याबाबत रुग्णालय परिसरातील नागरिकांनी सोलापूर शहर पोलीस दलाला माहिती दिली,सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी गंगामाई हॉस्पिटल येथे येऊन सदर पोलीस कर्मचाऱ्यास ताब्यात घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्यात घेऊन आले.पीएसआय डोंगरे यांनी डान्स करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास ताब्यात घेतले व पोलीस स्टेशनला घेऊन आले.राजेश पवार (एएसआय,नेमणूक,मंगळवेढा पोलीस ठाणे) असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

मानसिक रित्या खचल्याची प्राथमिक माहिती-
सदर बाजार पोलिसांनी संबंधित पोलीस कर्मचारी राजेश पवार यांना ताब्यात घेऊन  अधिक माहिती घेतली असता,मंगळवेढा पोलीस ठाणे येथे नियुक्तीस आहेत.त्यांना सोलापुरातील रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते.पण मानसिकता ढासळलेल्या राजेश पवार यांनी रुग्णालयाबाहेर येऊन डांस केला.गंगामाई रुग्णालया बाहेर उपस्थित असलेल्या नागरिकांनी व्हिडीओ चित्रीकरण करुंन सोशल मिडियावर अपलोड  केले.सदर बाजार पोलिसांनी राजेश पवार पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीस व मुलास बोलावून चौकशी करुन ताब्यात दिले.

Post a Comment

0 Comments