पत्रकार व पोलीस यांच्यावरील अन्याया विरूद्ध संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलनसोलापूर |

 चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर  आठ पोलीस कर्माचारी तर तीन पोलिस अधिकाऱ्यांवर निंलबनाची अन्यायकारक कारवाई  राज्य सरकार च्या वतीने करण्यात आली हि कारवाई रद्द करण्यात यावी म्हणून संभाजी ब्रिगेड च्या वतीने धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

याप्रकरणी कोणत्याही पोलिसांवर कारवाई करु नका, त्यांची यामध्ये काहीही चूक नाही अशी विनंती चंद्रकांत पाटील यांनी करून देखील  राज्य शासना च्या वतीने पोलिसांचे निलंबन करण्यात आलं आहे.
पोलीस प्रशासन व पत्रकार यांच्यावर झालेली कारवाई म्हणजे लोकशाहीची गळचेपी करण्या सारखा प्रकार आहे  पत्रकार हे लोकशाही चा चौथा स्तंभ आहे समाजातील अन्याया विरुद्ध न्याय देण्याचे काम करीत असताना ही कारवाई संविधान विरोधी आहे. 

पोलीस यंत्रणा ही कायद्याची अंमलबजावणी करून नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी पार पडते ऊन पाऊस वारा याची तमा न करता नागरिकांच्या संरक्षणासाठी व नेत्यांच्या बंदोबस्तासाठी 24 तास आपली प्रामाणिकपणे सेवा बजावत असतात सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांनी महापुरुषावर बेताल वक्तव्य करून त्यांचा अवमान करीत आहेत त्याचे पडसाद  समाजमध्ये उठून  जनतेची प्रतिक्रिया हिंसक होऊन अश्या घटना घडत आहेत या संतापजनक घटना राजकीय नेत्यामुळेच घडलेले आहेत यात पोलिसांचा कोणताही दोष नाही पोलीस हा शेवटी मानवच आहे मशीन नाही जी त्याला गुन्ह्य़ांचा आधी पूर्वकल्पना मिळू शकेल त्यामुळे राज्य शासनाने जी पत्रकार व पोलिसावर कारवाई केली ते अन्याय कारक असून त्यांच्यावर झालेली अन्यायकारक निलंबनाची कारवाई त्वरित मागे घ्यावी अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. 

यावेळी संभाजी ब्रिज शहराध्यक्ष आम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले कार्याध्यक्ष अरविंद शेळके जिल्हा सचिव राजेंद्र माने शहर संघटक दत्ता जाधव बबन डिंगणे मुस्तफा शेख महेश सरोदे मंजुनाथ पास्ते नागेश शिल्पकार उपाध्यक्ष सिताराम बाबर इत्यादी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments