अवैधरीत्या वाळूचा उपसा करणाऱ्या जेसीबीसह सहा लाखाचा मुद्देमाल जप्त ; तालुका पोलिसांची कारवाईबार्शी |

बार्शी तालुक्यातील चारे शिवारातील ओढ्यातून अवैधरित्या वाळू काढत असताना एक ब्रास वाळू आणि जेसीबी असा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बार्शी तालुका पोलिसांनी केली आहे.

बार्शी तालुका पोलिसांना अवैद्यरित्या वाळू उपसा ची माहिती मिळताच, तालुका पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. पोलिस आल्याचा जेसीबी चालकाला सुगावा लागल्याने तो जेसीबी तेथेच सोडून पळून गेला. त्यावेळी पोलिसांनी त्याठिकाणी पंचनामा करून साडेसात हजार रुपये किंमतीची एक ब्रास वाळू व सहा लाख रुपये किंमतीचा जेसीबी असा माल जप्त केला.

पोलीस कॉन्स्टेबल शंकर वाघमारे यांनी जेसीबी मालक प्रशांत प्रकाश जगदाळे, रा. चारे व नांव, पत्ता माहित नसलेल्या जेसीबी ऑपरेटर यांच्याविरोधात बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Post a Comment

0 Comments