आता जिनिलिया वहिनी "हाडाच्या मराठी" झाल्या...परिपक्व रितेशचा जबरदस्त "वेड"!


खूप खूप अभिनंदन प्रिय रितेशजी-जिनिलियाजी!
काल मुंबईत मेट्रो आयनॉक्सला "वेड" पाहिला! जबरदस्त!!.. रितेश तुम्ही "सिनेमा माध्यमा" वरील तुमची मांड मजबूत बसवलीय् . सादरीकरण, पटकथा, चित्रिकरण आणि सर्वच तांत्रिक आघाडीवर तुमची पकड आहे.सुरुवातीलाच स्क्रीनवर आदरणीय साहेबांचे कॅरिकेचर आले.."तुमच्या मुळे.. तुमच्यासाठी" या ओळी दिसल्या अन्... अक्षरशः अंगावर शहारे आले! रितेश, तुम्ही सिनेसृष्टीत परिपक्व झालात! तसं तर "वेड" ही " वन लाईन स्टोरी" पण तुम्ही थिएटर मधील पहिल्या रांगेतील खुर्च्यांवरील सिनेरसिकांपासून शेवटच्या रांगेतील खुर्च्यांवरील व्हाईट कॉलर सिनेरसिकांची नस पकडली. 

गतिमानता ही "वेड" चं बलस्थान आहे. अजय-अतुल पासून ते अशोकमामा-सिध्दार्थ जाधव पर्यंत सर्वांनीच आणि चित्रपट संकलकांनी त्या गतिमान तेरा न्याय दिलाय.तुमच्यातला सत्त्या आणि जिनिलियाजीं मधील श्रावणी प्रत्येकजण स्वतःत पाहतो..दोन-तीन वेळा तर थिएटर मधील प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू टपकतात! आणि हो,जिनिलिया वहिनी आता "हाडाच्या मराठी" झाल्याचं प्रमाणपत्र "वेड" देतो...लय लय भारी..लगेच रहो!
-राजा माने,
संपादक, राजकीय विश्लेषक व माध्यम तज्ज्ञ.
अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.
प्रदेशाध्यक्ष, व्हॉइस ऑफ मीडिया महाराष्ट्र.

Post a Comment

0 Comments