विदेशी गेलेल्या पत्नीला बोलावून घ्या म्हणत सासूवर चाकू हल्ला
सोलापूर |

आखाती देशात पाठविलेला पत्नीला बोलावून का घेत नाही? या कारणावरून जावयाने सासूला चाकूने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील विडी घरकुल परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली.

या प्रकरणात पोलिसांनी जखमीच्या जावयाला अटक केली. त्याला ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने मंगळवारी दिला आहे. शहनाज इलियाज कोरबू (वय ४७ रा. कुंभारी घरकुल) असे जखमी झालेल्या सासूचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या संदर्भात जखमीचा मुलगा कादर इलियास कोरबू यांनी वळसंग पोलिसात फिर्याद दाखल केली.

त्याप्रमाणे पोलिसांनी हुसेन कमरोद्दिन शेख (वय ३२ रा. सत्तरफूट रोड, इंदिरानगर सोलापूर) याला अटक केली. त्याला ९ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. आरोपी हुसेन शेख याची पत्नी सुमय्या ही तीन आठवड्यापूर्वी मुले आणि पतीला सोलापुरात ठेवून कुवेत येथे नोकरीसाठी गेली होती. पत्नी विदेशी गेल्यानंतर मुले निराश झाली होती. त्यामुळे तो पत्नीला परत बोलावून घ्या. असे सासूला म्हणाला होता. मात्र सासूने नकार दिला. त्यामुळे हुसेन शेख (जावई) याने चाकूने सपासप वार करून सासूला जखमी केले. अशी नोंद पोलिसात झाली. पुढील तपास फौजदार उस्मान शेख हे करत आहे.

Post a Comment

0 Comments