टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माची सेटवरच आत्महत्या


अली बाबा: दास्तान-ए-काबुलमध्ये भूमिका निभावलेली टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. तुनिषा शर्माचं नायगाव येथे शूटिंग सुरु होतं. मालिकेच्या सेटवरील वॉश रुममध्ये तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती आहे. आतमध्ये गेलेली तुनिषा खूप वेळ बाहेर येत नसल्याने सहकाऱ्यांनी आतमध्ये प्रवेश केला तर ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. 

सेटवरील सहकाऱ्यांनी तिला तातडीने रुग्णालयात हलवलं. परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. तुनिषाचं वय २० वर्षे होतं. तिने आत्महत्या का केली? याचं कारण समजू शकलेलं नाही. मालिकेचं शूटिंग सुरु असतांना सेटवरच आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. तुनिषाला लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. 4 जानेवारी 2002 रोजी चंदीगडमध्ये तिचा जन्म झाला. झाला. अवघ्या 14 व्या वर्षी तिची 'भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप' या मालिकेसाठी निवड झाली होती.

‘भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप' या मालिकेत तिने राजकुमारी चंद कंवरची भूमिका केली होती. त्याच वर्षी तिने चक्रवर्ती अशोक सम्राट या टीव्ही मालिकेत राजकुमारी अहंकाराची भूमिकाही साकारली होती. त्यानंतर तिने गब्बर पुंचवाला आणि शेर-ए-पंजाब : महाराजा रणजीत सिंग या चित्रपटात भूमिका केल्या. तुनिषाच्या अचानक एक्झिटने हळहळ व्यक्त केली जातेय.

Post a Comment

0 Comments