दत्तात्रय मचाले यांना पीएचडी पदवी

 

बार्शी |

शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभाग अध्यापना बरोबर संशोधन करणारे दत्तात्रय मचाले ( गुळपोळी ता बार्शी ) यांना पीएचडी पदवी प्राप्त झाली. त्यांच्या पीएचडी संशोधनाचा विषय "कोल्हापूर संस्थानाचा आर्थिक इतिहास :१८४५ ते १९४७" हा होता. सदर संशोधनामध्ये त्यांनी १८४५ ते १९४७ या कालखंडातील कोल्हापूर संस्थानातील कृषी व्यवस्था, उद्योगधंदे, व्यापार आणि बाजारपेठा, सहकारी चळवळी, दळणवळण आणि शहरांचा विकास, सार्वजनिक वित्त यातून संस्थानाच्या आर्थिक इतिहासाची मांडणी केली आहे. 

तसेच दुष्काळ, प्लेग, पहिले जागतिक महायुद्ध, जागतिक महानंदी, दुसरे जागतिक महायुद्ध इत्यादी घटकांचा संस्थानाच्या आर्थिक परिस्थितीवर झालेल्या परिणामाची मांडणी केली आहे. १८४५ ते १८९४ आणि १८९४ ते १९४७ या दोन टप्प्यांचा तुलनात्मक अभ्यास केला आहे. यासाठी त्यांनी अनेक प्राथमिक व दुय्यम साधनांचा वापर केला आहे. तसेच तत्कालीन अनेक अहवाल, सर्वेक्षण इत्यादी साधनांचा वापर केला आहे. सदर संशोधनासाठी त्यांना इतिहास अधिविभागाचे  विभागप्रमुख डॉ. अवनीश पाटील सर, तसेच डॉ. अरुण भोसले, डॉ. नंदा पारेकर, डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. भरतभूषण माळी यांचे मार्गदर्शन मिळाले.

Post a Comment

0 Comments