पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वत: माध्यमांसमोर ही नाराजी बोलून दाखवली. शहराध्यक्ष पदावरून हटविल्यानंतर वसंत मोरे यांनी पक्षातील कोअर कमिटीच्या नेत्यांवर नाराजीही व्यक्त केली होती. तसेच, या सर्व अंतगर्त वादांवरून त्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी सुद्धा चर्चा केली होती.
मात्र, त्यानंतर स्वतः पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करत पक्षांतील अंतर्गत बाबी सोशल मीडिया अथवा माध्यमांशी बोलल्या तर कारवाई करण्याचा इशाराच राज ठाकरेंनी दिला आहे. त्यामुळे हे पत्र पुण्यातील मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांना उद्देशून असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. दरम्यान, आता पुन्हा एकदा वसंत मोरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये वसंत मोरे म्हणाले की, “राजकारणाच काय खरे नाही, निवडणुका ही लोकं कधी घेतील माहिती नाय बाबा... जरा उद्योग व्यावसायाकडे लक्ष केंद्रित करतो...' असं वसंत मोरे म्हणाले आहे. मात्र, आता त्यांच्या या फेसबुक पोस्ट मुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे.
काय आहे? राज ठाकरेंचं पत्र वाचा...
“माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र, सध्या माध्यमांसमोर किंवा सोशल मीडियावर जाऊन वाट्टेल ते बोलायचं, प्रसिद्धी मिळवायची असं करणाऱ्या उथळवीरांची भरती सगळ्याच पक्षात दिसून येत आहे. माध्यमांनी दिलेली प्रसिद्धी आणि सोशल मीडियाचे लाईक्स ह्याच्याने हे सगळे शेफारले आहेत. इतर पक्षांनी अशा लोकांचं काय करावं हे त्यांनी ठरवावं, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत हे मी खपवून घेणार नाही.
0 Comments