ऊस तोडणी मुकादम व मजूर यांचे कडून वाहन मालकाच्या फसवणुकी संदर्भात आमदार बबनदादा शिंदे यांची विधानसभेत लक्षवेधी..


माढा |

साखर कारखान्यासाठी ऊस तोडणी करणारे मुकादम व मजूर यांच्याकडून ऊस वाहतूकदार वाहन मालकांची लाखो रुपयांची फसवणूक करून वाहन मालकावर ॲट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल करून व प्रसंगी वाहन मालकाची हत्या करण्यात येत असल्याचे संदर्भात शासनाने रास्त व न्याय निर्णय  घ्यावा यासाठी माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना उपस्थित करून या गंभीर प्रश्नाला वाचा फोडली आहे.
  
सभागृहात आमदार बबनदादा शिंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर  विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार आमदार हसन मुश्रीफ आमदार विनय कोरे आमदार संजय मामा शिंदे यांनीही चर्चेत भाग घेऊन आपल्या सूचना मांडल्या . 
      
लक्षवेधी विषयी आमदार बबन दादा शिंदे म्हणाले की ऊस तोडणी मजूर टोळ्या आणणारे मुकादम वाहन मालकाकडून पाच ते दहा लाख रुपये ॲडव्हान्स  घेतात व ऐनवेळी मजूर पुरवठा न करता पैसे बुडवतात व फसवणूक करतात. या मजूर टोळ्या परळी बीड नांदेड परभणी हिंगोली बसमत कर्नाटक गुजरात मध्य प्रदेश या भागातून आणल्या जातात. पैसे घेणाऱ्या व फसवणाऱ्या मुकादमाकडे वाहन मालकांनी पैसे वसुलीसाठी प्रयत्न केले किंवा वारंवार विचारणा केल्यास मुकादामा कडूनच दमदाटी केली जाते तसेच वाहन मालकावरती  ॲट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल केले जातात व उचललेले पैसे मात्र बुडवले जातात, हे सर्व गुन्हे मुकादम व मजूर  रहिवासी असलेल्या  ठिकाणच्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदवले जातात व अशा प्रकारात वाहन मालकावरच गंभीर प्रसंग निर्माण होत आहेत. माढा तालुक्यातील रिधोरे आणि अंजनगाव उमाटे येथील वाहन मालकांना  आपले पैसे मुकादमानी बुडवून देखील तुरुंगात जाण्याची पाळी आलेली आहे. तसेच याहून गंभीर आणि भीषण बाब म्हणजे बेंबळे तालुका माढा येथील प्रशांत महादेव भोसले हे वाहन मालक 29 ऑक्टोबर रोजी सेंधवा- मध्य प्रदेश - येथे मजूर टोळी आणण्यात गेले असता 30 ऑक्टोबर रोजी सेंधवा नजीक राजुरी खेड्यातून ठेकेदार, मुकादम व मजुरांना चार लाख रुपये ऍडव्हान्स दिलेले होते व सायंकाळी  पिकप टेम्पोतून मजूर घेऊन येत असताना प्रशांत भोसले यांना त्यांच्या स्कार्पिओ मधून गोड बोलून पिकप मध्ये घेतले व आत मध्येच त्यांना बेदम मारहाण करून त्यांचे खिशातील साठते सत्तर हजार रुपये काढून घेऊन त्यांना मारून टाकले आणि त्यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आला व नंतर हे टोळी मुकादम व मजूर टेम्पो पिकअप  गायब झाले. पुढे गेलेल्या स्कार्पिओ मधील  त्यांच्या नातेवाईकांना बऱ्याच वेळा नंतर शंका आल्यामुळे त्यांनी परत येऊन शोध घेतला असता प्रशांत भोसले यांचा मृतदेह त्यांना रस्त्याच्या कडेला आढळून आला. याविरुद्ध चार दिवसानंतर सेंधवा पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल करण्यासाठी बेंबळे इथून काही शेतकरी गेले असता तेथील पोलीसानी काही सहकार्य न करता उलट याच लोकांना धमक्या दिल्या व पोलीस स्टेशनचे बाहेर 50 ते 60 आदिवासी मजूर जमा झाले.  पोलिसांनी  रात्री आठ वाजता स्पॉट पंचनाम्याला येण्यास तयार आहात का तरच एफ आय आर लिहून घेतो असे सांगितले. शेवटी हे सर्वजण होय म्हणाले आणि कशीबशी सहा वाजता एफ आय आर दाखल करून घेतली  . नंतर आम्ही बाहेर जाऊन येतो म्हणून सांगून आपला जीव मुठीत धरून हे गेलेले शेतकरी कसेबसे  महाराष्ट्र हद्दीत परत आले अन्यथा यांच्या ही जीवाला धोका झाला असता हे निश्चित.
 
आमदार बबनदादा शिंदे विधान भवनात पुढे म्हणाले की ऊस वाहतूक करणारे वाहन मालक ही शेतकऱ्याची मुले आहेत व शेतीला जोडधंदा म्हणून ते स्वतःच्या जबाबदारीने हा व्यवसाय करतात परंतु आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील मागील एक वर्षात वाहन मालकांचे 39 कोटी रुपये ऊस तोडणी मुकादम आणि मजुरानी बुडवले आहेत व सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत किमान 200 कोटी रुपये बुड ऊन या मुकादम लोकांनी फसवलेले आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व कारखान्यांच्या चेअरमन, एमडी व शेतकी अधिकारी यांची एक नुकतीच बैठक घेऊन  या प्रश्नावर सविस्तर चर्चा करून एक समिती देखील नेमण्यात आलेली आहे. याबाबत आता शासनाने योग्य व कठोर व रास्त निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments