सोलापुरात आरोपीचा झटका ; पोलिसाच्या तावडीतून आरोपीची पलायन



सोलापूर |

पोलीस ठाण्यात चौकशी करण्यासाठी आणलेल्या आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका देऊनपलायन केल्याची घटना शनिवारी 24 डिसेंबर रोजी घडली आहे. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातुन संशयीत चोरट्याने धूम ठोकली आहे. या घटनेमुळे सोलापूर ग्रामीण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

न्यायालयात हजर करण्यासाठी त्याला लॉकअप बाहेर
काढले होते-
देवराज दिलीप पवार (वय 19, रा. वडार गल्ली) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. पवार याच्याविरुद्ध उत्तर पोलीस ठाण्यात चोरी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात दक्षिण ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे यांच्या पथकाने आरोपीला शनिवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यासाठी लॉक अपबाहेर काढले होते.

पोलिसांच्या हाताला झटका देत त्याने धूम ठोकली-
संशयीत आरोपी देवराज पवार यास प्रथमवर्ग न्यादंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यासाठी पोलीस कर्मचारी दासरे व अंगुले यांनी नेले. न्यायालयाने त्यास 26 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यास पोलीस ठाण्यामध्ये चौकशी व जबाब घेण्यासाठी आणून बसविले. त्यावेळी तो अचानक उठल्याने पोलीस पथकाने त्याच्या हाताला पकडले. त्यावेळी पोलिसाच्या हाताला हिसका देऊन तो पळून गेला. त्याचा पाठलाग केला असता तो मिळून आला नाही. या घटनेची तक्रार काकडे यांनी उत्तर पोलीस ठाण्यात दिली.

Post a Comment

0 Comments