फेक शिक्षणाधिकारी म्हणून गुन्हा दाखल असलेल्या महिलेने गाठले शिक्षण विभाग


सोलापूर |

 वळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी जाकीरा फिरदोस गफ्फार शेख, शाहिद उल्लू खान या दोघांना फेक शिक्षणाधिकारी म्हणून शाळा तपासणी करत असताना पकडले. 22 डिसेंबर 2022 रोजी वळसंग पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा देखील झाला आहे. संबंधित महिलेने गुरुवारी 28 डिसेंबर 2022 रोजी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण खात्यात येऊन मोठा गोंधळ केला. तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण लोहार यांनी मला, शिक्षण खात्याचे ओळखपत्र बनवून दिले.शिक्षण खात्यात भरपूर नोकऱ्या आहेत, उमेदवार आणा असे सांगत पैसे घेण्यास सांगितले. जवळपास 20 ते 22 लाख रुपये मी तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण लोहार यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला दिले
असे गंभीर आरोप यावेळी केले. प्रभारी शिक्षण अधिकारी संजय जावीर हे मिटिंग संपवून जाताना जाकिरा शेख या महिलेने अडविले साहेब मला फसवले गेले, तुम्ही देखीलत्यात सहभागी आहात असे गंभीर आरोप केले. यावेळी प्रभारी शिक्षण अधिकारी संजय जावीर यांनी मी तुम्हाला ओळखत नाही असे स्पष्टपणे
सांगत निघून गेले.

महिला म्हणतेय मला स्वतःला माहीतच नव्हते, मी फेक शिक्षण अधिकारी आहे-

जाकिरा गफ्फार शेख ही महिला गेल्या दोन वर्षांपासून सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळामध्ये जाऊन मी इंस्पेक्शन अधिकारी आहे, शाळा व पटसंख्या तपासणी करण्यासाठी आले. ही बाब दोन वर्षांपासून सुरु होती. तत्कालीन शिक्षण अधिकारी किरण लोहार यांना लाच घेताना अटक झाल्यानंतर, त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. किरण लोहार ड्युटीवर असेपर्यंत दररोज एक दोन शाळा तपासणी करून किरण लोहार यांकडे सादर करत होते. ज्यावेळी मला पोलिसांनी अटक केली, त्यावेळी मला माहिती झाले की, मला कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरी नाही.शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी मला फसविले आहे. माझ्या कडे नांदेड जिल्ह्यातील शिक्षण खात्याचा ओळखपत्र सोलापूर शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांनी
दिले आहे, असा गंभीर आरोप जाकीरा शेख या महिलेने केला आहे. तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार, माध्यमिक शिक्षण अधिकारी भास्कर बाबर यांवर गंभीर आरोप केले.

प्रभारी शिक्षण अधिकारी संजय जावीर यांनी महिलेला ओळख देण्यास स्पष्टपणे नकार दिला-

किरण लोहार यांवर निलंबन कारवाई झाल्या पासून प्रभारी शिक्षण अधिकारी म्हणून संजय जावीर कामकाज पाहत आहेत. किरण लोहार शिक्षणाधिकारी असताना संजय जावीर उपशिक्षणाधिकारी होते. किरण लोहार यांकडे मी अनेकदा आले, त्यावेळी तुम्ही देखील माझ्याशी बोलला आहेत, मला आता, ओळख का देत नाही,मी माझ्या परिसरातील अनेक लोकांकडून शिक्षण खात्यात नोकरी लावते असे सांगून, रक्कम घेतली आहे.ती रक्कम फसवून घेतली आहे. ती रक्कम परत द्या असे संताप व्यक्त करत सांगत असताना प्रभारी शिक्षण अधिकारी संजय जावीर यांनी ओळख देण्यास स्पष्टपणे नकार देत काढता पाय घेतला. संबंधित महिला प्राथमिक शिक्षण विभागात ताटकळत बसून बसून उद्या येते असे सांगून गेली आहे. आता हे प्रकरण कुठं पर्यंत जाणार,कोणकोणते अधिकारी यामध्ये अडकतील या पाहण्यासारखे आहे.

Post a Comment

0 Comments